

आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे, काकासाहेब पवार आणि गोविंद पवार यांचा पठ्ठा, सोलापूर जिल्ह्याचा वेताळ शेळके हा महाराष्ट्र केसरी झालाय. कर्जत इथं पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यानं मुंबईचा पृथ्वीराज पाटील याच्याविरुद्ध गुणांच्या आधारे कुस्ती जिंकली. वेताळ शेळके हा माढा तालुक्यातल्या बेंबळे गावचा आहे.