esakal | राज्यातील अनेक पोलिस निरीक्षक अजुनही अतिरिक्त; अधिकाऱ्यांना विना वेतन काम करण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Hundreds of Police Inspectors in Maharashtra not getting Salaries Latest News

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभरातील प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेले आणि विनंती बदल्यासाठी अर्ज केलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून सव्वाशेवर पोलिस अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळाली नाही.

राज्यातील अनेक पोलिस निरीक्षक अजुनही अतिरिक्त; अधिकाऱ्यांना विना वेतन काम करण्याची वेळ

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः दिवाळीपूर्वीच प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेल्या जवळपास साडेतीनशेवर पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यापैकी बऱ्याच पोलिस निरीक्षकांना अजुनही नियुक्ती मिळाली नाही. अतिरिक्त ठरल्यामुळे अधिकाऱ्यांना विना वेतन काम करावे लागत असल्यामुळे राज्य पोलिस दलात नाराजीचा सूर आहे.  

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभरातील प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेले आणि विनंती बदल्यासाठी अर्ज केलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून सव्वाशेवर पोलिस अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या सर्वच पोलिस निरीक्षकांना वेतन मिळत नाही. हा सर्व घोळ पोलिस महासंचालक कार्यलयातीला बाबूगिरीमुळे झाला आहे. 

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू

पोलिस महासंचालक कार्यालयातील बदल्यांची यादी बनवितांना मंजूर पदे आणि सध्यस्थितीतील पदे याचा तालमेळ बसविण्यात आला नाही. विनंती बदली झालेल्यांना लगेच पोस्टींग देण्यात आली तर प्रशासकीय कालावधी पूर्ण झाल्यामुळे बदली झालेल्यांना अजुनही वेटींगवर ठेवण्यात आले आहे. अनेक पोलिस अधिकारी आर्थिक अडचणीत आले आहे. या प्रश्‍नावर मुंबईतील आस्थापना विभाग प्रतिक्रिया द्यायला तयार नाही तर दुसरीकडे गृहमंत्रालय याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अनेक पोलिस अधिकारी तोंड दाबून बुक्‍क्यांचा मार सहन करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांनाच नियुक्ती मिळाल्याचा आरोप होत आहे. 

अधिकाऱ्यांना पदोन्नती कधी 

कोविड काळात अविरत सेवा केल्यामुळे कोरोनायोद्धा म्हणून काम करणारे राज्य पोलिस दलातील अनेक सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. डिसेंबर महिन्यांतच पदोन्नती मिळण्याची शक्यता असताना केवळ डीजी कार्यालयात सुरू असलेल्या घोळामुळे पदोन्नतीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. सध्या एपीआय आणि पीएसआय दर्जाचे अधिकारी पदोन्नतीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याचे चित्र आहे. 

अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

पोलिस निरीक्षकांनी महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात ‘सेटींग’ पोस्टींग मिळवली. तर ओळखी नसलेले पोलिस अधिकारी मात्र अजुनही आज-उद्या पोस्टींग मिळेल या आशेवर बसले आहेत. दिवाळीपासून पगार नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घराचे ईएमआय आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्यांना आटापीटा करावा लागत असल्याची चर्चा आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image