‘महा’ चक्रीवादळ निवळले

sun
sun

पुणे - 'महा’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने येताना निवळले असून, गुरुवारी दुपारपर्यंत किनाऱ्यालगतच्या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. या प्रणालीमुळे गुजरात, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान निर्माण झाले होते. 

राज्याच्या काही भागांत उकाड्यात प्रचंड वाढ होऊन पावसाळी ढग गोळा होऊ लागले होते. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने काहीशी उघडीप दिल्याने तापमानात वाढ कायम आहे. महाबळेश्वर, कोल्हापूर, बुलडाण्यात तापमान ३० अंशांच्या खाली आहे, तर उर्वरित राज्यात तापमानाचा पारा तिशीच्या पुढे गेला आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी कमाल ३० ते ३४ अंश, तर किमान तापमान १७ ते २५ अंशांच्या आसपास होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com