पती म्हणतात, ‘तू रिक्षा घे मी चालवतो’! ई-पिंक रिक्षा घ्यायला सोलापूरच्या लाडक्या बहिणींचा नकार; सोलापूरला उद्दिष्ट ६०० रिक्षांचे, पण...

महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारने ई-पिंक रिक्षा योजना सुरू केली. सोलापूर जिल्ह्यातील ६०० महिलांना पहिल्या टप्प्यात रिक्षा मिळणार आहेत. एकही रुपया न भरता महिलांना रिक्षा मिळणार आहे, तरीपण लाडक्या बहिणींनी रिक्षा चालवायला आणि घ्यायला नकार दिला.
Smiles of self-reliance: Government to distribute free E-Pink Rickshaws to women

Smiles of self-reliance: Government to distribute free E-Pink Rickshaws to women

Sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारने ई-पिंक रिक्षा योजना सुरू केली. सोलापूर जिल्ह्यातील ६०० महिलांना पहिल्या टप्प्यात रिक्षा मिळणार आहेत. एकही रुपया न भरता महिलांना रिक्षा मिळणार आहे, तरीपण लाडक्या बहिणींनी रिक्षा चालवायला आणि घ्यायला नकार दिला. त्यामुळे अद्याप जिल्ह्यात एकाही महिलेस रिक्षा मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे.

ई-पिंक रिक्षा योजनेच्या महिला लाभार्थींना तीन लाख ७३ हजार रुपयांची रिक्षा एकही रुपया न भरता मिळणार आहे. ३० टक्के अनुदान आणि ७० टक्के बॅंकेतून कर्ज, अशी रक्कम दिली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण व लायसन्स आरटीओकडून मोफत मिळणार आहे. त्यानुसार ४३ महिलांचे अर्ज निकषांनुसार पात्र ठरले, पण त्यातील एकही महिला पुढे आलेली नाही. त्यांनी आरटीओकडून परवाना देखील घेतलेला नाही.

या योजनेसाठी एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी अशा मागासवर्गीयांसह आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिला पात्र आहेत. त्यांना वारंवार अर्जासाठी आवाहन करूनही नव्याने अर्ज प्राप्त झाले नसल्याचे महिला व बालविकास विभागातील अधिकारी सांगतात. सुरवातीला लाभार्थींना १० टक्के भरावी लागणारी रक्कम देखील माफ केली, तरीदेखील त्यांनी रिक्षा घेतलेली नाही, असेही अधिकाऱ्यांचे अनुभव आहेत.

पती म्हणतात, ‘तू रिक्षा घे मी चालवतो’!

जिल्ह्यातील १५७ महिलांनी योजनेतून ई-पिंक रिक्षा घेण्यासाठी अर्ज केले. त्यातील ४३ जणी सिबिल स्कोअर, कागदपत्रांनुसार पात्र ठरल्या. त्यांना मंजुरीही देण्यात आली. पण, त्यातील बहुतेक जणांचे पती म्हणतात, ‘तू तुझ्या नावे रिक्षा घे, मी चालवितो. आपल्याकडे महिला रिक्षा चालवत नाहीत. समाजातील लोक, नातेवाईक नावं ठेवतील.’ परंतु, योजना महिलांसाठीच असल्याने त्यांना ई-पिंक रिक्षा देता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सोलापुरातील योजनेची स्थिती

  • एकूण उद्दिष्ट

  • ६००

  • प्राप्त अर्ज

  • १५०

  • मंजूर अर्ज

  • ४३

  • रिक्षा मिळालेले

  • ०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com