''मी या सावित्रीची उपासक''; यशोमती ठाकूर यांच्या ट्विटची का होतेय चर्चा?

''मी या सावित्रीची उपासक''; यशोमती ठाकूर यांच्या ट्विटची का होतेय चर्चा?

पुणे : आज वट पोर्णिमा. आजच्या दिवशी सत्यवाण-सावित्रीची कथा सांगितली जाते. पण आजच्या काळात गरज आहे ती सावित्रीबाई फुले यांनी घडवलिलेल्या सावित्रीची. अशाच सावित्रीची जाणीव करुन देणारे ट्विट राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

आज वट पोर्णिमा. पतीच्या प्राणांचे रक्षणासाठी आणि त्याला दीर्घायुष्य लाभावे, म्हणून महिला आजच्या दिवशी वडाची पुजा करतात. वट सावित्रीची कथा या दिवशी महिलांना सांगितली जाते. वडाच्या झाडाखालीच सावित्रीने आपल्या पती सत्यावानची सेवा केली होती आणि तिथेच यमाने सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचं पूजन केलं जाते. पण आजच्या काळात गरज आहे ती सावित्रीबाई फुले यांनी घडवलिलेली सावित्रीची. जी शिक्षित आणि सबळ आहे, जी नोकरी- व्यवसाय सांभाळून घर संसार सांभाळतेय. जी वेगवेळ्या क्षेत्रात यशांच्या उंच शिखरावर झेप घेतेय.

आजच्या महिलांना प्रत्येकीच्या आत असलेल्या या सावित्रीची जाणीव करुन देणारे ट्विट राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी "ही सावित्री तुम्हाला अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर काढून तुमच्या मृत बुद्धीला पुन्हा जीवंत करण्याचं सामर्थ्य देते. मी या सावित्रीची उपासक आहे." असं सांगत खऱ्या सावित्रीची जाणीव करुन देणयाचा प्रयत्न केला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com