हा देश माझा वाटत नाही : आव्हाड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

लातूर : देशात आता अनेक नथुराम तयार होत असून, ते विचारवंतांची हत्या करीत आहेत. दंगली भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. महिला-मुली असुरक्षित आहेत. लोकशाहीवर हल्ले होत आहेत. देशात चार वर्षांत तयार झालेले हे वातावरण पाहून हा देश माझा नाही, असे वाटू लागलेयं, अशी भावना कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी (ता.26) उस्मानाबाद येथे व्यक्त केली. 

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे समितीच्या कार्यक्रमात आव्हाड यांनी "भारतीय संविधानाचा उद्देश आणि आजचे वास्तव' या विषयावर बोलताना हे मत मांडले. दलित महासंघाचे डॉ. मच्छिंद्र सकटे, समितीचे अध्यक्ष गोरख शिंदे, विलास जाधव, आशा भिसे आदी या वेळी उपस्थित होते. 

आव्हाड म्हणाले, "संविधान हे विशिष्ट वर्गाला कधी रुचलेच नाही. त्यामुळे संविधान बदलण्याचे प्रयत्न वेळोवेळी होत आहेत. यातूनच संविधान जाळण्याचे कृत्य झाले. तरीही कोणावर गुन्हा दाखल होत नाही. अशावेळी सर्वांनी एकत्र येऊन संविधानावर वाकडी नजर टाकणाऱ्यांना अडवले पाहिजे.'' 

आम्ही अनेक जण एकत्र येऊन राज्यात सर्वत्र "संविधान सन्मान परिषद' घेणार आहोत. या परिषदेची सुरवात लातूर येथून ऑक्‍टोबर महिन्यात होईल. या परिषदेसाठी संघटना, विचार, राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन आव्हाड यांनी या वेळी केले. 

कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिस यांची एकत्रित समिती स्थापन करून त्यांच्याकडे विचारवंतांच्या हत्येचा तपास सोपवायला हवा. 
- जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे आमदार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I think this not my country: Awhad