वाट पाहीन, पण लालपरीनेच जाईन! दररोज ३१ लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी bus
वाट पाहिन, पण लालपरीनेच जाईन! दररोज ३२ लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास

वाट पाहीन, पण लालपरीनेच जाईन! दररोज ३१ लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि रेल्वेतून प्रवास करण्यातील सर्वसामान्यांच्या अडचणींमुळे अनेकांनी खासगी वाहतुकीचा अनुभव घेतला. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, अतिवेग, प्रवास भाडे खूपच, या बाबींचा अनुभव घेतलेल्या प्रवाशांनी आता वाट पाहिन, पण लालपरीनेच जाईन, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संपानंतर एकाच महिन्यात (२२ एप्रिल ते २२ मे) लालपरीने अंदाजित ४७२ रुपये कमावले असून दररोज जवळपास ३१ लाख प्रवासी लालपरीने प्रवास करीत आहेत.

हेही वाचा: SP सातपुतेंचे ऑपरेशन परिवर्तन! रोजगार मेळाव्यातून १०० जणांना नोकरी

दरमहा नियमित वेतन, पगारवाढीवरून सुरु झालेले आंदोलन पुढे महामंडळाच्या विलीनीकरणावर अडले. उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून हा संप मिटविला, पण हा संप एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच महिन्यांपर्यंत राहिला. त्या काळात प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रत्येक १५ ते ३० मिनिटाला धावणारी लालपरी बस स्थानकात उभी होती. त्यावेळी गावातून शहरात घेऊन जाणाऱ्यांना लालपरीच्या खडतर प्रवासाचा अंदाज आला. उन्हाळा असो की पावसाळ्यातही अडथळ्यांची शर्यत पार करीत बसचे चालक, वाहक प्रवाशांना सुरक्षित पोहचवतात, याची जाणीव संप काळात प्रवाशांना झाली. वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या लालपरीने पैसे कधी कमावलेच नाहीत, ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरच लालपरीने प्रवाशांची सेवा केली. त्यामुळेच आता प्रवाशांची संख्या वाढू लागली असून दररोज ३१ लाखांहून अधिक ३२ लाखांपर्यंत प्रवासी लालपरीतून प्रवास करीत आहेत. त्यातून लालपरीला दररोज सुमारे १८ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. पण, त्यात इंधनाचाही खर्च आहे.

हेही वाचा: सोलापूर: काँग्रेसला गळती अन्‌ नेत्यांचे लक्ष मुंबई-दिल्लीत; राष्ट्रवादीचा डाव?

एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेळेवर वेतन मिळावे, यासाठी पुढील चार वर्षे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे सध्या प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद आहे. ती रक्कम बसस्थानक सुधारणांसह प्रवासी वाढीसाठी वापरली जाईल.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ

हेही वाचा: रस्ता सुरक्षेसाठी खासदारांना मिळेना वेळ! जिल्ह्यात साडेतीन वर्षांत दोन हजार मृत्यू

लालपरीची सद्यस्थिती
मार्गावरील बसेस
१५,३००
दररोजचे उत्पन्न
१८ कोटी
दररोजचे प्रवासी
३१ लाख
२२ एप्रिलनंतरचे उत्पन्न
४७२ कोटी

हेही वाचा: जिल्ह्यातील नेते म्हणाले, उजनीवरून राजकारण नको! २१ वर्षांपूर्वीची ‘लाकडी-निंबोडी’ योजना

सरकारकडून वेतनासाठी १४,४०० कोटी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दरमहा वेळेवर वेतन मिळावे, यासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना राज्य सरकार वेतन देणार आहे. दरवर्षी तीन हजार ६०० कोटीप्रमाणे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १४ हजार ४०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. लालपरीने कमावलेली रक्कम बस स्थानके सुधारणा, वायफाय सेवा यासह प्रवासी वाढीच्या दृष्टीने नियोजित कामांवर खर्च केली जाणार आहे.

Web Title: I Will Wait But I Will Go To Lalpari Every Day 31 Lakh Passengers Travel Through

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top