आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 मे 2017

मुंबई - राज्य सरकारतर्फे आणखी सहा "आयएएस' अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. रायगडच्या माजी जिल्हाधिकारी शीतल उगले यांची बदली पुणे महापालिकेत अतिरिक्‍त आयुक्‍त पदावर करण्यात आली आहे.

मुंबई - राज्य सरकारतर्फे आणखी सहा "आयएएस' अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. रायगडच्या माजी जिल्हाधिकारी शीतल उगले यांची बदली पुणे महापालिकेत अतिरिक्‍त आयुक्‍त पदावर करण्यात आली आहे.

राज्य सरकारने गेल्या आठवड्यात तब्बल 60 "आयएएस' अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यातील नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील प्रकल्प अधिकारी राजेंद्र बारूड यांची बदली सोलापूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे. यवतमाळच्या पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी दीपक कुमार मीना यांच्याकडे नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली. याच पदावर कार्यरत असलेल्या मिलिंद शंभरकर यांच्याकडे समाजकल्याण आयुक्‍तपदावर कार्यभार सोपवला आहे. तळोदा येथील प्रकल्प अधिकारी अभिजित राऊत यापुढे सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. शंभरकर यांच्या नियुक्‍तीमुळे पीयूष सिंग नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या आठवड्यात कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी असलेल्या अमित सैनी यांच्याकडे पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पात मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Web Title: ias officer transfer