

MCOCA Against Food Adulterators
esakal
Tukaram Munde Action: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासाच्या आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून भेसळखोरांवर कारवाईचा धडाका लावला आहे. बोगस पनीर, पेढा, दूध, लस्सी तसेच इतर खाद्यपदार्थांवर कारवाईचा धडाका सुरु आहे. तसेच गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ बनवणारे, विक्री करणारे, वाहतूक करणारे अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर आहेत. अशा लोकांवर मकोका लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (दि. १२) याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.