IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, आता ३ महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी; २१ वर्षात २५ वेळा झालीय बदली

IAS Tukaram Mundhe Transferred: बेधडक निर्णय घेणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झालीय. दिव्यांग कल्याण मंत्रालय सचिव असलेल्या तुकाराम मुंढे यांची ही २१ वर्षातली २५वी बदली ठरलीय.
IAS Tukaram Mundhe Transferred

tukaram mundhe

esakal

Updated on

IAS Tukaram Mundhe: राज्यातील १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. आतापर्यंत तुकाराम मुंढे यांची २१ वर्षात तब्बल २५ वेळा बदली झाली आहे. सध्या ते दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाचे सचिव असून त्यांची नियुक्ती आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य, महसूल व वन विभाग मंत्रालय अशा तीन विभागांच्या सचिवपदी करण्यात आलीय. दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयात सचिव म्हणून काम करताना गेल्या वर्षभरात त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. Tukaram Mundhe Transferred

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com