esakal | ICSI CS Result 2020: 'सीएस’ परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील दोघे चमकले

बोलून बातमी शोधा

CS_Exams}

कंपनी सचिव परीक्षेत जुन्या अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संस्थेच्या ‘www.icsi.edu’ या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

maharashtra
ICSI CS Result 2020: 'सीएस’ परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील दोघे चमकले
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ICSI CS Professional Result 2020: पुणे : द इनस्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज्‌ ऑफ इंडियाच्या वतीने डिसेंबर २०२०मध्ये घेण्यात आलेल्या कंपनी सचिव (सीएस) एक्झीकेटिव प्रोग्रॅम आणि प्रोफेशनल प्रोग्रॅम परीक्षेचा निकाल गुरूवारी (ता.25) जाहीर करण्यात आला. कंपनी सचिव परीक्षेत संपूर्ण देशात जयपूर येथील तन्मय अगरवाल (एक्झीकेटिव प्रोग्रॅम-जुना अभ्यासक्रम) आणि इंदौर येथील आकांक्षा गुप्ता (एक्झीकेटिव प्रोग्रॅम- नवीन अभ्यासक्रम) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 

कंपनी सचिव परीक्षेत जुन्या अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना संस्थेच्या ‘www.icsi.edu’ या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. तर औरंगाबाद परीक्षा केंद्रातील सुदर्शन महर्षी (प्रोफेशनल प्रोग्रॅम-जुना अभ्यासक्रम) आणि तापी येथून तनया ग्रोव्हर (प्रोफेशनल प्रोग्रॅम- नवीन अभ्यासक्रम) यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; बापट यांची मागणी​

कंपनी सचिव परीक्षेत एक्झीकेटिव प्रोग्रॅम (जुना अभ्यासक्रम) परीक्षा दिलेले मॉड्यूल -एक मधील १५.२१ टक्के विद्यार्थी, तर मॉड्यूल -दोनमधील २१.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर एक्झीकेटिव प्रोग्रॅम (नवीन अभ्यासक्रम) परीक्षा दिलेले ‘मॉड्यूल-एक’चे ८.२७ टक्के, तर ‘मॉड्यूल-दोन’चे १५.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘सीएस’ परीक्षेतंर्गत प्रोफेशनल प्रोग्रॅममधील (जुना अभ्यासक्रम) ‘मॉड्यूल -एक’चे २७.८८ टक्के, तर ‘मॉड्यूल-दोन’चे २८.२६ टक्के, तर ‘मॉड्यूल-तीन’चे ३३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी; थेऊरच्या 'श्री चिंतामणी' मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद​

तर नवीन अभ्यासक्रमाद्वारे प्रोफेशनल प्रोग्रॅम मोड्यूल एक परीक्षा दिलेले १९.३९ टक्के, तर ‘मोड्यूल-दोन’चे १७.८१ टक्के आणि ‘मोड्यूल-तीन’चे ३४.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता कंपनी सचिव एक्झीकेटिव प्रोग्रॅम आणि प्रोफेशनल प्रोग्रॅम ही परीक्षा १ ते १० जून २०२१ या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी २५ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)