Supriya Sule
Supriya SuleEsakal

Supriya Sule: 'अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास...', सुप्रिया सुळेंनी घातली देवेंद्र फडणवीस यांना अट

अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याबाबत वारंवार अनेक तर्क वितर्क, चर्चा, पोस्टर, बॅनर यांच्या चर्चा सुरू असतात
Published on

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याबाबत वारंवार अनेक तर्क वितर्क, चर्चा, पोस्टर, बॅनर यांच्या चर्चा सुरू असतात. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानेराजकीय नेत्याच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘‘अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सर्वात जास्त आनंद मलाच होईल. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना माझी एक अट असेल, की अजितदादांना पहिला हार मला घालू द्यावा,’’ अशी इच्छा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

नगरमध्ये माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, की फडणवीस किती मोठ्या मनाचे आहेत, भाऊ मोठा कसा असावा, तो देवेंद्रजींसारखा असावा. १०५ आमदार असतानाही दुसऱ्याला मुख्यमंत्रिपद द्यायची त्यांची तयारी आहे.

Supriya Sule
Ajit Pawar: 'शरद पवार जिथे सभा घेतील त्याठिकाणी...', अजित पवार गटाचा मोठा निर्णय

मात्र, दादाला माझी एवढीच विनंती राहील, की तू जेव्हा मुख्यमंत्री होशील, तेव्हा गृहमंत्री पद दुसरे कोणालाही दे. मात्र, फडणवीस यांना ते देऊ नको. तरच राज्यातील आमचे हेरंब कुलकर्णी यांच्यासारखे भाऊ सुरक्षित राहतील, असा टोलाही सुळे यांनी यावेळी लगावला आहे.

दिल्लीच्या अदृश्य शक्तीची भीती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा, याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, की मला न्यायालयावर आणि निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे. मात्र, तो पेपर फुटला आहे का? काही गोलमाल आहे का? दिल्लीची अदृश्य शक्ती ही काहीतरी गडबड करेल, अशी शंका वाटते.

Supriya Sule
Lalit Patil Drugs Case: ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाला वाराणसीतून अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

कारण त्या गटातील ज्येष्ठ नेते म्हणतात, की पक्ष आम्हालाच मिळणार आहे. चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वांनाच माहिती आहे, की राष्ट्रवादी पक्ष कोणी स्थापन केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com