चित्रा वाघ यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

चित्रा वाघ यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

मुंबई : प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित झाल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. यामुळे आता चित्रा वाघ या आमदार म्हणून विधानसभेत सरकारला धारेवर धरताना दिसू शकतील.

हेही वाचा: ना रुकेंगे ना थमेंगे...; NCB च्या कारवाईवरून क्रांतीचं नवं ट्विट

मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी चित्रा वाघ यांचं नाव सर्वात पुढे आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्षा असलेल्या चित्रा वाघ यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. उद्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीनंतर होणाऱ्या कोअर कमिटी बैठकीत यावर अंतिम शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे.

धुळे-नंदुरबारमधून पुन्हा अमरीश पटेल यांना संधी?

धुळे-नंदुरबारमधून पुन्हा एकदा अमरीश पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमधून शौमिका महाडिक आणि राहुल आवाडे ही दोन नावे चर्चेत असून यातील एका नावावर शिक्कामोर्तब होईल. यामध्ये शौमिका महाडिक यांचे नाव आघाडीवर आहे. शौमिका महाडिक या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या आहेत. नागपूरच्या जागेसाठी भाजपत अद्याप खल सुरू आहे.

हेही वाचा: 'स्वार्थी राजकारणामुळे आदिवासी समाज दुर्लक्षित', मोदींचा काँग्रेसवर निशाणा

दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १० डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार असून १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

loading image
go to top