Eknath Shinde : "मला सल्ला हवा असेल तर मी शरद पवारांना फोन करतो" If I need advice, I call Sharad Pawar Pawar praised by CM Eknath Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde : "मला सल्ला हवा असेल तर मी शरद पवारांना फोन करतो"

राज्यातील सत्तांतर आणि नाट्यमय घडामोडीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्रित दिसणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मला ज्यावेळी सल्ल्याची गरज असते. त्यावेळी मी शरद पवारांना फोन करतो. ते नेहमी चांगले सल्ले देतात," असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या कार्यक्रमावेळी जयंत पाटील, विरोधीपक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित होते.

हेही वाचा: Maharashtra Politics : NCPच्या नेत्याने काढलं काँग्रेसच्या बड्या नेत्याचं स्टँडर्ड म्हणाले...

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

"शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते. गेल्या आठवड्यात संक्रात झाली, त्यामुळे गोड गोड बोलायचं, मीही गोड गोड बोलणार. मी नुकतंच दावोसला जाऊन आलो. कोणी काहीही म्हणो पण मी चांगली गुंतवणूक आणली. शरद पवार यांना यासंदर्भात माहिती आहे. शरद पवार नेहमीच राज्याच्या हितासाठी आणि भल्यासाठी मार्गदर्शन करतात. मलाही जेव्हा जेव्हा गरज असते, तेव्हा मी त्यांना फोन करतो तेव्हा ते मला सूचना देतात. सहकार क्षेत्रात त्यांचं असणारं योगदान हे नाकारता येणार नाही," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचं कौतुक केलंय."

हेही वाचा: Sharad Pawar : सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शरद पवार अन् एकनाथ शिंदे एकाच मंचावर; पुण्यातील...