'पंतप्रधानपदासाठी पवारांचे नाव पुढे आले तर शिवसेना मदत करणार'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

नाशिक : आगामी काळात पंतप्रधान पदासाठी शरद पवार यांचे नाव पुढे आले तर शिवसेना त्यांना मदत करु शकते, असा दावा शक्‍यता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर बेतलेल्या 'ठाकरे' चित्रपटाचा खास खेळ आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावतीने झाला. यावेळी विविध पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांसह मोठी गर्दी होती. यावेळी विचारलेल्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात भुजबळ यांनी वरील विधान केले.

'ठाकरे' चित्रपटामध्ये एका प्रसंगात मराठी माणुस पंतप्रधान होणार का? असा संवाद बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडी आहे. त्या अनुषंगाने भुजबळ म्हणाले, ''स्वतः शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदारांची संख्या, सद्य राजकीय स्थिती व देशातील वातावरण याविषयी बोलतांना स्वतःच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे अनेकदा सांगितले आहे. मात्र कर्म धर्म संयोगाने पवार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले तर मराठी माणुस पंतप्रधान होत असल्याने स्थितीत शिवसेना त्यांना नक्की मदत करु शकते असा विश्‍वास वाटतो. अर्थात या सर्व जर तर अशा गोष्टी आहेत."

चित्रपटाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते म्हणाले, "हा चित्रपट ठाकरे यांच्यावर आहे. अन्य कोणी नेत्यांविषयी नाही. त्यामुळे काय प्रसंग घेतले, त्यात कोणता नेता आहे, कोणता नाही अशी शंका अथवा प्रश्‍न योग्य होणार नाही. आजच्या पिढीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कसे होते, कसे निर्णय घेत होते, हे समजुन घेण्यासाठी हा चित्रपट प्रत्येकाने जरुर  पाहिला पाहिजे. मी व माझे कुटुंब शिवसेनेच्या स्थापनेच्या पहिल्या- दुसऱ्या दिवसांपासूनच त्यात होतो. मी त्यांना जवळून पाहिले आहे. त्यांच्या अनेक संघर्षात मी सहभागी झालो आहे. माझे कुटुंबीय त्यांच्याशी चांगले परिचित आहे." बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य, आवाका, आलेख, जीवन एव्हढे विलक्षण आहे की, एका चित्रपटात ते बसणारच नाही. त्यासाठी सहा सात चित्रपट काढावे लागतील, असेही श्री. भुजबळ म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ नेते, वनाधिपती विनायकदादा पाटील, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी खासदार समीर भुजबळ, भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ यांसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विविध नेत उपस्थित होते. विशेष म्हणजे चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वारावर भुजबळ यांचे आगमन झाल्यावर जुन्या पिढीतील शिवसैनिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. नंदन रहाने, दादा बोरसे, अनिल वाघ, प्रदिप बोरसे, दादाजी अहिरे, शंकरराव बव्रे आदी जुन्या पिढीतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: if pawar name comes pm candidate shivsena will support him says chagan bhujbal