esakal | साखर कारखानदारांनो, 'फुले 265'ची नोंद न घेतल्यास गाळप परवाना नाकारणार
sakal

बोलून बातमी शोधा

साखर कारखानदारांनो, "फुले 265'ची नोंद न घेतल्यास गाळप परवाना नाकारणार

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने केलेल्या फुले 265 या वाणाचा तीनही हंगामात सरासरी साखर उतारा 14.40 टक्के आढळला आहे.

कारखानदारांनो, 'फुले 265'ची नोंद न घेतल्यास गाळप परवाना नाकारणार

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (Mahatma Phule Agricultural University) पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने (Padegaon Sugarcane Research Center) केलेल्या फुले 265 या वाणाचा तीनही हंगामात सरासरी साखर उतारा 14.40 टक्के आढळला आहे. वाण को 86032 मध्ये साखरेचे (Sugar) प्रमाण 14.47 मिळाले. फुले 265 हा वाण मध्यम ते उशिरा पक्व होणारा असून, थंडीचा कालावधी मिळाल्यावर डिसेंबर / जानेवारीनंतर हा वाण तोडणीस योग्य असतो. सुरू ऊस 12 महिन्यांनी, पूर्व हंगामी ऊस 14 महिन्यांनी आणि आडसाली ऊस 16 महिन्यांनी तोडणी केल्यास फुले 265 या वाणापासून साखर उतारा चांगला मिळत असल्याचे कृषी विद्यापीठाने सांगितले.

हेही वाचा: वाहनधारकांनो सावधान! वाहतूक पोलिसांकडे आता बॉडी वोर्न कॅमेरा

पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रामार्फत कोएम 0265 (फुले 265) हा उसाचा वाण महाराष्ट्रात 2007 मध्ये आडसाली, पूर्वहंगाम आणि सुरू या तिन्ही हंगामात लागवडीसाठी शिफारस करण्यात आला. त्यानंतर 2009 मध्ये हा वाण गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यात लखनऊ येथील अखिल भारतीय ऊस संशोधन संस्थेने शिफारशीत केला आहे.

फुले 265 या ऊस वाणाच्या लागवडीस शासनाची परवानगी असून, हा वाण ऊस लागवडीस व गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित झाले आहे. म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या फुले 265 या ऊस वाणाची नोंद कारखान्यांनी घ्यावी. जे साखर कारखाने फुले 265 वाणाच्या ऊस लागवडीची नोंद घेणार नाहीत, त्या कारखान्यांचा गाळप परवाना नाकारण्यात येईल, अशी भूमिका साखर आयुक्तांनी घेतली आहे.

हेही वाचा: देशभरातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत 'आयएपी'चे मोठे विधान!

ऊस उत्पादनातील ही किमया फुले 265 मुळेच शक्‍य झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी अर्थशास्त्र विभागाने या वाणाच्या प्रभावाचा अभ्यास केला. त्यामध्ये असे आढळून आले, की 2009-10 ते 2016-17 या नऊ वर्षात शेतकरी आणि साखर कारखानदार यांना 31 हजार 681 कोटी इतका आर्थिक फायदा झाला आहे.

- कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील

ठळक

  • फुले 265 वाणाची तोडणी जानेवारीनंतर करावी

  • या वाणाच्या खोडव्याची फूट व वाढ चांगली

  • जवळपास 13 खोडवे शेतकऱ्यांनी घेतल्याची अनेक उदाहरणे

  • चाबूककाणी, मर व लालकुज या रोगांना प्रतिकारक

  • खोड कीड, कांडी कीड, शेंडेकीड व लोकरी मावा या किडींचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव

loading image
go to top