esakal | बेशिस्त वाहनधारकांनो सावधान! वाहतूक पोलिसांकडे आता बॉडी वोर्न कॅमेरा
sakal

बोलून बातमी शोधा

बेशिस्त वाहनधारकांनो सावधान! वाहतूक पोलिसांच्या शर्टावर आता बॉडी वोर्न कॅमेरा

वाहनधारकानो, आता थोडं सावध राहा. कारण, तुम्ही एखाद्या तक्रारीवरून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत असाल तर त्याचे चित्रीकरण होण्याची शक्‍यता आहे.

वाहनधारकांनो सावधान! वाहतूक पोलिसांकडे आता बॉडी वोर्न कॅमेरा

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : वाहनधारकानो, आता थोडं सावध राहा. कारण, तुम्ही एखाद्या तक्रारीवरून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांशी (Traffic Police) वाद घालत असाल तर त्याचे चित्रीकरण होण्याची शक्‍यता आहे. शहर वाहतूक पोलिस प्रशासनाने (City Traffic Police Administration) आता वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या शर्टावर बॉडी वोर्न कॅमेरा (Body worn camera) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक शाखेत पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांच्या शर्टावर बॉडी कॅमेरा बसवला जात असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

हेही वाचा: उपळाईच्या शेतकऱ्याने नादच केलाय थेट! 25 गुंठ्यांत 16 टन डाळिंब

वाहतूक शाखेच्या पोलिसांबरोबर वाहनचालकांचे अनेकदा वाद होतात. वाहनचालक अनेकदा हुज्जत घालत असतात. अनेकांची तर पोलिसांची कॉलर पकडण्यापर्यंत मजल जाते. अशा साऱ्या घटना आता कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त होणार आहेत. रेकॉर्डिंग होत असताना व्हायब्रेशन सिग्नल असणार आहे. आता दोन्ही प्रकारच्या या कॅमेऱ्यांत ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंगची सोय असणार आहे. हा कॅमेरा सीसीटीव्हीसारखा काम करणारा असून, तो मूव्हेबल असणार आहे. चेक पॉईंट व वाहतूक नियंत्रणासाठी तो वापरला जाणार असल्याचे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या आठ दिवसांत सोलापूर वाहतूक शाखेस हे कॅमेरे मिळणार असल्याचे देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले.

असे काम करणार बॉडी कॅमेरा

बॉडी वोर्न कॅमेरा वाहतूक पोलिसांच्या शर्टावर लावला जाणार आहे. खिशाला किंवा खांद्याच्या बाजूला असणार आहे. याचे वजन 85 ग्रॅम असणार आहे. तो वॉटरप्रूफ आहे. कॅमेऱ्यामध्ये ऑडिओ व एचडी कॅमेरा असल्याने व्हिडिओ स्पष्टपणे दिसणार आहे. हा कॅमेरा वापरणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांशी नियंत्रण कक्षातून देखील संवाद ठेवता येणार आहे.

हेही वाचा: देशभरातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत 'आयएपी'चे मोठे विधान!

ठळक बाबी....

  • वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर येणार नियंत्रण

  • पोलिस आणि वाहनधारकांमध्ये समन्वय साधणे होणार शक्‍य

  • विनाकारण वाद घालणाऱ्यांवर येणार नियंत्रण

  • 30 ते 40 फूट अंतरावरीलही चित्रीकरण होणार

  • 16 मेगा फिक्‍सेल कॅमेरा

  • आठ तासांची असणार रेकॉर्डिंगची क्षमता

  • 32 जीबी असणार साठवणूक क्षमता

  • 50 कर्मचाऱ्यांना मिळणार बॉडी वोर्न कॅमेरा

वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. यामध्ये नेमका दोष कुणाचा, हे आता समजणे शक्‍य झाले आहे. येत्या आठ दिवसांत वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना बॉडी वोर्न कॅमेरा दिला जाणार आहे.

- दीपाली धाटे-घाडगे, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक

loading image
go to top