esakal | देशभरातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत 'आयएपी'चे मोठे विधान!
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा

देशातील काही भाग वगळता कोविड -19 च्या प्रादुर्भावात घट झाल्यानंतर शाळा उघडण्यात आल्या आहेत.

देशभरातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत 'आयएपी'चे मोठे विधान!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : देशातील काही भाग वगळता कोविड -19 च्या (Covid-19) प्रादुर्भावात घट झाल्यानंतर शाळा (School) उघडण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये तसेच उच्च शैक्षणिक संस्था (Higher educational institutes) आणि महाविद्यालयांमध्ये (College) सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) नियम पाळून वर्ग सुरू झाले आहेत. दरम्यान, इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्‍सने (Indian Academy of Pediatrics - IAP) देशभरातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत मोठे विधान केले आहे. शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा स्तरावर घेण्यात यावा, असे ऍकॅडमीने म्हटले आहे.

हेही वाचा: 'ओएनजीसी'ची 'जीटी' पदांसंदर्भात महत्त्वाची अधिसूचना !

इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्‍स (IAP) ने स्थापन केलेल्या टास्क फोर्सने सध्याची कोविड-19 ची परिस्थिती आणि वैज्ञानिकांच्या मतांच्या आधारे देशातील शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शिफारसी जारी केल्या आहेत. त्यात म्हटले, की शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय विकेंद्रीकृत केला पाहिजे. तो राष्ट्रीय किंवा राज्य स्तरापेक्षा स्थानिक परिस्थितीनुसार जिल्ह्यांच्या पातळीवर (शहर / गाव / शाळा) घेतला पाहिजे. याशिवाय, ऍकॅडमीच्या सदस्यांनी सांगितले की, शाळांमध्ये कोविड-19 प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्‍सने असेही म्हटले आहे की, कोरोना उद्रेकाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य सेवा यंत्रणा पुरेशी तयार असावी. याव्यतिरिक्त, कोविड-19 प्रकरणांचा दर 15 दिवसांनी स्थानिक पातळीवर आढावा घेतला पाहिजे. बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने स्थानिक पातळीवर शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

हेही वाचा: एक्‍झिक्‍युटिव्ह पदांसाठी 'हिंदुस्थान फर्टिलायझर्स'मध्ये भरती!

आयएपीने म्हटले आहे की, पालक आणि विद्यार्थ्यांच्या इतर सदस्यांना देखील लसीचा किमान एक डोस मिळाला पाहिजे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याबाबत संमती दिली पाहिजे. तसेच उच्च जोखमीच्या मुलांनी शाळांमध्ये जाण्यापूर्वी त्यांच्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आयएपी म्हणते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी, ड्रायव्हर्स, परिचर आणि शाळेतील अभ्यागतांसह शाळांमध्ये काम करणाऱ्या आणि त्यांच्याशी जवळून संपर्कात असलेल्या सर्व प्रौढ सदस्यांना कोविड लसीचा किमान एक डोस मिळाला पाहिजे.

loading image
go to top