esakal | महाराष्ट्रात येताय? विमान प्रवाशांसाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स
sakal

बोलून बातमी शोधा

Karad Airport

कोरोना प्रतिबंधक लशीचे तुम्ही दोन्ही डोस घेतले असलीत तर तुम्हाला विमानतळावर कोविड-19 टेस्ट रिपोर्ट दाखवण्याची आवश्यकता लागणार नाही

महाराष्ट्रात येताय? विमान प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- विमानाने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लशीचे तुम्ही दोन्ही डोस घेतले असलीत तर तुम्हाला विमानतळावर कोविड-19 टेस्ट रिपोर्ट दाखवण्याची आवश्यकता लागणार नाही. नविन गाई़डलाईन्स डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रवाशांसाठी लागू असणार आहेत. त्यामुळे दोन्ही डोस घेतलेल्या आणि महाराष्ट्रात येऊ पाहणाऱ्या लोकांना विमानतळावर RT-PCR टेस्ट करावी लागणार नाही. (If you are flying to Maharashtra taken both shots of coronavirus vaccine no longer be required negative Covid 19 test RTPCR report at the airport)

महाराष्ट्र सरकारने गुरुवारी जाहीर केलं की, ज्यांचं लसीकरण पूर्ण झाले आहे आणि ज्यांच्याकडे दुसरा डोस घेऊन पंधरा दिवस झाल्याचे सर्टिफिकेट आहे अशांना RT-PCR टेस्ट न करता महाराष्ट्रात परवानगी असेल. तसेच सरकारने RT-PCR टेस्टचा कालावधी वाढवला असून 48 तासांवरुन तो 72 तास करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांकडे 72 तासांच्या आतील RT-PCR रिपोर्ट असल्यास तो चालू शकणार आहे. असे असले तरी सर्व प्रवाशांना कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

हेही वाचा: अफगाणिस्तानच्या संघर्षात भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दिकी यांचा मृत्यू

राज्यातील कोरोना परिस्थिती

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज दहा हजारांच्या आत नोंदली जात आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याने कोरोना निर्बंध कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री याबाबत लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्यात गुरुवारी 8 हजार 010 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 61 लाख 89 हजार 257 झाली आहे. राज्यात एकूण 1,07,205 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात नियंत्रणात आलेला मृत्यूचा आकडा पुन्हा वाढला. राज्यात 170 रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा 1 लाख 26 हजार 560 वर पोहोचला आहे. दिवसभरात 7 हजार 391 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 59 लाख 52 हजार 192 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के एवढे झाले आहे.

loading image