शाळांचे ‘फायर ऑडिट’कडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

मुंबई - राज्य सरकारने वारंवार सूचना केल्यानंतरही अनेक शाळांच्या इमारतींमध्ये अग्निशामक यंत्रणा बसवलेली नाही. तसेच यंत्रणांची तपासणी होत नसल्याच्या तक्रारी आल्याने शिक्षण विभागाने शाळांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना पालिकेच्या शिक्षण विभागाला दिल्या आहेत. 

शाळांनी फायर ऑडिट आणि मॉकड्रील करून त्याचा अहवाल पाठविण्याच्या सूचना उपशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.  अग्निशामक यंत्रणा बसवून घेण्याबाबत तसेच हाताळण्याच्या प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण उपशिक्षणाधिकारी कार्यालयाने एप्रिलमध्ये दिले होते.  

‘कंत्राटदारांच्या ऑडिटचा घाट’
पालिकेचा शिक्षण विभाग इतर शाळांना सावत्रपणाची वागणूक देत आहे. प्रत्येक शाळेत अग्निशमन यंत्रणा आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन काही सुधारणा आवश्‍यक असल्यास सूचना करणे अपेक्षित होते. या अधिकाऱ्यांनी २००९ पासून शाळांना भेटी दिलेल्या नाहीत. उपशिक्षणाधिकारी यांनी खासगी अग्निशमन यंत्रणेतील कंत्राटदारांना फायदा  देण्यासाठी ऑडिटचा घाट घातल्याचा आरोप मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी केला. 

Web Title: Ignore the schools fire audit