

IIT Students Death Case
Esakal
मुंबई : देशातील नामांकित आयआयटींच्या भिंतीआड दडलेले विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जानेवारी २००६ ते सप्टेंबर २०२६ या २० वर्षांत विविध आयआयटीत तब्बल १७१ विद्यार्थ्यांचा आत्महत्या किंवा अन्य अनैसर्गिक कारणांनी मृत्यू झाला. केंद्र सरकारने लोकसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या पाच वर्षांतील आकडेवारीनुसार, पाच वर्षांतच ४५ आत्महत्या नोंदल्या गेल्या असून, त्यापैकी २८ विद्यार्थी एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील आहेत.