IITM study : राज्याच्या अक्षय ऊर्जेच्या क्षमतेवर होणार वातावरण बदलाचा परिणाम

महाराष्ट्र आणि शेजारच्या प्रदेशात पवन ऊर्जेच्या संभाव्य क्षमतेबाबत बहुतांश क्लायमेट मॉडेल्समध्ये सकारात्मक कल दिसून येतो.
IITM study
IITM studygoogle

मुंबई : महाराष्ट्रात अक्षय ऊर्जा (renewable energy) विकसनासाठी सुरू असलेल्या जोरदार प्रयत्नांबाबत, पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी (आयआयटीएम) या संस्थेच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे.

वातावरण बदलाचा परिणाम अनेक क्षेत्रांवर आणि आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत घटकांवर होत असतो, तसाच तो महाराष्ट्राच्या सौर आणि पवन ऊर्जेच्या संभाव्य क्षमता विकसनावरदेखील पुढील पाच दशके होणार असल्याचे यातून दिसून येत आहे.

Analysis of future wind and solar potential over India using climate models’ या शीर्षकाचा ताजा अभ्यास नुकताच करंट सायन्स या पिअर-रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. भू-विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आयआयटीएम, पुणे येथील टीएस आनंद, दीपा गोपालकृष्णन आणि पार्थसारथी मुखोपाध्याय तसेच, न्यूयॉर्क विद्यापीठ अबुधाबी येथील सेंटर फॉर प्रोटोटाईप क्लायमेट मॉडेलिंग येथील संशोधकांचा यामध्ये समावेश आहे.

IITM study
Electric ST Bus | एसटीची ही इलेक्ट्रिक बस एकदा पाहाच | Sakal Media |

भारतीय उपखंडातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातले पवन आणि सौर ऊर्जेच्या अंदाजाचे नजीकच्या भविष्यासाठी (पुढील ४० वर्षे) विश्लेषण करण्यासाठी, संशोधकांनी इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजद्वारा (आयपीसीसी) तयार केलेल्या अत्याधुनिक क्लायमेट मॉडेल्सचा वापर करुन हा अभ्यास केला आहे.

“आपल्या उद्योग व्यवसायांनी वातावरण बदलानुसार जुळवून घेणे, बदल करणे अत्यावश्यक आहे आणि त्यानुसार आपल्या तंत्रज्ञानाची गती राखणे गरजेचे आहे. अभ्यासात वर्तविलेल्या अंदाजांकडे भविष्यातील शक्यता म्हणून पाहावे लागेल.

महाराष्ट्र आणि नजीकच्या प्रदेशातील अक्षय ऊर्जेच्या कार्यक्षमतेवर वातावरण बदलामुळे नक्कीच परिणाम होणार आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आणि त्यावर उपाय करण्याचे महत्व यावर या अभ्यासाचा भर आहे,” असे पार्थसारथी मुखोपाध्याय म्हणाले.

या ताज्या अभ्यासाच्या संशोधकांनी असेही नोंदवले आहे की, महाराष्ट्र आणि शेजारच्या प्रदेशात पवन ऊर्जेच्या संभाव्य क्षमतेबाबत बहुतांश क्लायमेट मॉडेल्समध्ये सकारात्मक कल दिसून येतो. “मान्सूनचे महिने येत्या काही वर्षांत अधिक वादळी आणि ढगाळ राहणार आहेत. या प्रदेशात भविष्यात सकारात्मक क्षमता कल दिसून येत असल्याचे नोंदवितानाच ही क्षमता मात्र उर्वरित मध्य भारताप्रमाणे नसेल, असे मुखोपाध्याय यांनी नमूद केले.

IITM study
अन्न कचऱ्यावरील विजेमुळे वाहनांना ‘ऊर्जा’ - आदित्य ठाकरे

अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी स्थापित यंत्रणेच्या क्षमतेमध्ये (१०.७८ गिगावॉट) महाराष्ट्र देशातील अव्वल राज्यांमध्ये आहे. ज्यामध्ये पवन ऊर्जा ५.०१ गिगावॉट आणि सौर ऊर्जा २.७५ गिगावॉटचा वाटा आहे. तसेच विकेंद्रीत यंत्रणेतील अक्षय ऊर्जा निर्मितीमध्येदेखील दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रातील एकूण ऊर्जा निर्मितीमध्ये ३० जून २०२२ पर्यंत २४.३६ टक्के वाटा अक्षय ऊर्जा क्षेत्राचा आहे.

यामुळेच राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पुढील सहा वर्षांमध्ये अक्षय ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी १२ गिगावॉट सौर ऊर्जानिर्मितीचे प्रकल्प उभारण्याच्या महत्वाकांक्षी योजनांना प्रोत्साहन मिळाले आहे. भविष्यात ऊर्जा निर्मिती वाढून ऊर्जा खरेदीचा खर्च कमी होईल हे उद्दीष्ट यामागे आहे. तर सध्या देशभरातील पवन ऊर्जा निर्मितीमध्ये 15 टक्के वाटा राज्य उचलत आहे.

जानेवारी 2021 मध्ये जाहीर झालेल्या राज्य शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणानुसार महाराष्ट्र 2030 पर्यंत 40 टक्के ऊर्जा ही अक्षय ऊर्जा स्रोतांद्वारे निर्माण करुन या क्षेत्रातील नेतृत्वाच्या मार्गावर राहण्याचा राज्याचा मानस आहे. राज्यात 250 ते 300 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाचे असतात. त्यानुसार सरासरी चार ते सहा किलोवॉट प्रति तास (kWh) प्रति चौरस मीटर ऊर्जा निर्मिती होऊ शकते.

केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या (MNRE) आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील स्थापित सौर ऊर्जा क्षमता ही २०१६ आणि २०२१ च्या दरम्यान ६१४ टक्क्यांनी वाढली आहे. २०१६ मध्ये ३८५.७६ मेगावॉटवरुन २०२२ मध्ये २७५३.३० मेगावॉट इतकी झाली आहे.

राज्याच्या अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणानुसार २०२५ पर्यंत १७.३६ गिगावॉट ऊर्जा प्रकल्प पारेषण संलग्न अक्षय ऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी अपेक्षित आहे. ज्यामध्ये १२.९३ गिगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पांसह ग्रिड जोडणी असलेल्या दोन गिगावॉटच्या घराच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील वाऱ्यांची स्थिती पाहता ४५ ते १०० गिगावॉट पवन ऊर्जेची संभाव्य क्षमता आहे. महाराष्ट्र हे वाऱ्यांची पूरक स्थिती असणाऱ्या अशा देशातील सात राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये पवन-ऊर्जाधारीत मुख्य बाजारपेठ आहे. चार राज्ये मिळून ७२ टक्के वाटा उचलतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com