Dhaba News : धाब्यावर जाऊन दारू पित असाल तर सावधान ! त्या आधी वाचा ही बातमी

dhaba
dhaba sakal

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने लवंग (ता. माळशिरस) येथील हॉटेल राजमुद्रावर छापा टाकला. न्यायालयाने हॉटेल तथा ढाबा मालकाला २५ हजार रुपये तर तीन मद्यपींना प्रत्येकी एक हजारांचा दंड ठोठावला.

अकलूज विभागाचे दुय्यम निरिक्षक राजेंद्र वाकडे यांच्या पथकाने मंगळवारी (ता. २५) सायंकाळच्या सुमारास लवंगच्या हद्दीतील हॉटेल राजमुद्रावर छापा टाकला. त्याठिकाणी अवैधरित्या मद्यविक्री सुरु होती. तर तीन मद्यपी त्याठिकाणी मद्यपान करीत होते. या कारवाईवेळी दोन हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

dhaba
Desi Daru Vs English Wine : देशी दारू आणि ब्रँडेड दारू यात विशेष फरक नाही… फक्त याच एका कारणामुळे ती महाग होते

गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी एक दिवसात तपास पूर्ण करून बुधवारी (ता. २६) न्यायालयात तपासपत्र सादर केले. माळशिरसचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आलोक देशपांडे यांनी हॉटेल चालकास २५ हजारांचा तर मद्यपींना प्रत्येकी एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक राजेंद्र वाकडे, कैलास छत्रे, सहायक दुय्यम निरीक्षक रवी पवार, जवान तानाजी जाधव, गजानन जाधव व विजयकुमार शेळके यांच्या पथकाने पार पडली.

dhaba
Uddhav Thackeray : ‘ईडी’, ‘सीबीआय’चेच भाजपला समर्थन - उद्धव ठाकरे

ढाब्यावर विनापरवाना मद्यपान करणे गुन्हा

जिल्ह्यातील कोणत्याही परिसरात अवैधरीत्या दारूची निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास राज्य उत्पादन विभागाला कळवावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच ढाब्यावर बसून मद्यपान हा कायद्याने गुन्हा असून यापुढे ढाब्यांवर बसून दारू पिणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा अधीक्षक नितीन धार्मिक यांनी इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com