esakal | IMD : राज्यात चार दिवस जोरदार पावसाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

IMD : राज्यात चार दिवस जोरदार पावसाचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्याच्या विविध भागांमध्ये पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे सोमवारी हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

ओमानकडे गेलेल्या ‘शाहीन’ चक्रीवादळाची तीव्रता भारतात सध्या कमी होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच नैऋत्य बंगालचे उपसागर व तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. केरळ व तमिळनाडू किनारपट्टीपासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. परिणामी येत्या ८ ऑक्टोबरपर्यंत कोकण आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल.

मध्यम सरींची पुण्यात शक्यता

पुणे शहर परिसरात सोमवारी जोरदार पाऊस झाला. दुपारपर्यंत ऊन आणि सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. तसेच नागरिकांची तारांबळही उडाली. दरम्यान, पुढील चार दिवस शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

loading image
go to top