
Shakti Cyclone
ESakal
गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाडा, सोलापूर, जालना, जळगाव अशा कित्येक विभागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे समोर आले. बळीराजा या आर्थिक संकटातून बाहेर पडत असताना हवामान विभागाने पुन्हा धोक्याचा इशारा दिला आहे.