Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

पुन्हा एकदा पावसाने राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे
Weather Update
Weather Update Esakal
Updated on: 

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. परंतु राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. काल (शनिवारी) मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता.

दरम्यान शनिवारी राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. आजही राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Weather Update
Weather Update: मुंबईत पावसाच्या तुरळक सरी, विदर्भाला यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज

तर सोमवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागातर्फे ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेतही भर पडली आहे.

Weather Update
Weather Update: राज्यात पावसाचे पुनरागमन? आज 'या' भागांत पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक गावांमध्ये घरांमध्ये पवसाचे पाणी शिरले. अनेक भागात पाणी साचून राहिलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात दमदार हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Weather Update
Weather Update: राज्यात पावसाचं पुनरागमन; विदर्भासह 'या' ठिकाणी होणार मुसळधार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

India weather forecast October 10
IMD weather forecast October 8 heavy rain alert
21 States Rain Alert
Maharashtra Weather Today Rain Break Heat And Humidity Rise Pune Satara Sangli Solapur Beed Latur Nanded Rain Forecast
Marathi News Esakal
www.esakal.com