हुतात्मा जवानांच्या वारसाला तत्काळ नोकरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सोलापूर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 639 वीरपत्नी राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसमधून प्रवास करतात. त्यांना या योजनेंतर्गत ओळखपत्र दिली आहेत.

सोलापूर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 639 वीरपत्नी राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसमधून प्रवास करतात. त्यांना या योजनेंतर्गत ओळखपत्र दिली आहेत.

तसेच हुतात्मा जवानांच्या वारसाला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विनामुलाखत परिवहन विभागात नोकरी दिली जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्‍वभूमीवर 1 मे 2018 पासून ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. राज्य परिवहनच्या सर्वच एसटी बसमधून या वीरपत्नींना मोफत प्रवास करता येणार आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास खासगी वाहतुकीपेक्षा सुरक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाने एसटी बसमधूनच प्रवास करावा, असे आवाहन रावते यांनी या वेळी केले.

Web Title: Immediate job for the heirs of martyrs