महत्त्वाची बातमी! विद्यापीठातील ‘या’ अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षा ऑनलाईन; अर्ज करण्यासाठी 26 मेपर्यंत मुदत; 29 ते 31 मेपर्यंत परीक्षा, वेळ 60 मिनिटे

शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येतील.
solapur
solapur univercityEsakal

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संकुलासह संलग्नित काही महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यासाठी २६ मेपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेशपूर्व परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या www.sus.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ मेपासून सुरू झाली असून अंतिम मुदत २६ मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. पदवी उत्तीर्ण विद्यार्थी व पदवी अंतिम परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षेसाठी बसता येणार आहे. पदार्थविज्ञान संकुलाच्या एमएस्सी फिजिक्स- अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरिअल सायन्स, कंडेन्सड मॅटर फिजिक्स, एनर्जी स्टडी, सॉलिड स्टेट व नॅनो फिजिक्स, एमएस्सी इलेक्ट्रॉनिक सायन्स, इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रॉनिक्स इंटरनेट ऑफ थिंग्ज अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. तसेच एमएस्सी- मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉर्मटिक्ससाठीही पूर्वपरीक्षा होईल. एमएस्सी- केमिस्ट्रीच्या पॉलिमर, ऑरगॅनिक, इंडस्ट्रिअल, मेडिसिनल केमिस्ट्री, इनऑरगॅनिक, फिजिकल, ॲनालिटिकल, फार्मास्युटिकल, एमएस्सी- इन्व्हरमेंटल सायन्स, एमएस्सी- कॉम्प्युटर सायन्स मॅथेमॅटिक्स, एमएस्सी- स्टॅटिस्टिक्स, एमएससी- बायोस्टॅटिस्टिकस, एम.ए.मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमांची देखील प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. तसेच एमएस्सी- बॉटनी, झुलॉजी, एमएस्सी- ॲग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट, इंटरप्रिनरशिप या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे.

विद्यापीठ अधिविभागात ‘या’ अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश

एमएस्सी- जिओलॉजी, जिओइन्फॉर्मेटिक्स, एम. ए. प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र, ग्रामीण विकास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि इतिहास, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, एम. ए. मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, उर्दू, पाली, प्राकृत, कन्नड व एम. ए. संगीत, नाटक, तबला व पखवाज आणि व्हिज्युअल आर्ट्स, एम. कॉम. ॲडव्हान्स अकाउंटन्सी, ॲडव्हान्स बँकिंग आणि एमबीए, बीव्होक पत्रकारिता व जनसंज्ञापन, ॲडव्हान्स पी. जी. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक मीडिया, पी. जी. डिप्लोमा इन म्युझिकोलॉजी, फाइव्ह इयर एमटेक कोर्स इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, पी. जी. डिप्लोमा इन डायटिक्स अँड न्यूट्रिशन आणि एम. ए. योगा या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाच्या परिसरातील अधिविभागांमध्ये थेट प्रवेश देण्यात येणार आहे.

प्रवेश पूर्वपरीक्षेसंदर्भात...

  • प्रवेशपूर्व परीक्षा वेब बेस्ड ऑनलाइन प्रणालीद्वारे घेतली जाईल

  • परीक्षेची लिंक २४ तास उपलब्ध राहील, २६ मेपर्यंत परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करावी

  • प्रवेशपूर्व परीक्षेची पूर्वतयारी सराव चाचणी २७ मे रोजी होईल

  • अंतिम प्रवेशपूर्व परीक्षा २९ ते ३१ मेपर्यंत होईल परीक्षेचा कालावधी ६० मिनिटांचा असेल

  • प्रवेशपूर्व परीक्षेसाठी ५०० रुपयांचे शुल्क राहणार असून एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांसाठी अर्ज केल्यास प्रत्येक अभ्यासक्रमांसाठी २०० रुपये अधिकचे शुल्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com