औरंगाबादच्या नामांतरावरून जलील यांची शिंदे सरकारवर टीका; म्हणाले आता दररोज...

Imtiyaj Jalil
Imtiyaj Jalil Sakal

औरंगाबाद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत मागच्या सरकारने घेतलेल्या काही निर्णायात बदल केल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार शहरांच्या नामांतरात आणखीकाही बदल करत त्याला सरकारने अधिकृत ठरवलं आहे. (Imtiaz Jaleel News in Marathi)आता तरुणांना नोकऱ्या मिळू लागतील का? ते आमचे क्रीडा विद्यापीठही परत आणतील का? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर केव्हा मिळेल?249270

Imtiyaj Jalil
माझ्या 'डेथ सर्टिफीकेट'वरही औरंगाबादचेच नाव हवं; इम्तियाज जलील आक्रमक

मागच्या सरकारने घाईगडबडीत, अल्पमतात असताना काही निर्णय घेतले होते. त्या निर्णयांचे प्रस्ताव पुन्हा एकदा सादर करायला सांगितले होते. त्यानुसार आम्ही निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिली आहे. आता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशीव असं करण्यात आलं आहे.

दरम्यान औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. औरंगाबादचं नामकरण केलं, मात्र औरंगाबादकरांना ८ दिवसांऐवजी रोज पाणी कधी देणार असा सवाल जलील यांनी सरकारला केला आहे. याआधी जलील यांनी नामांतराला विरोध करण्यासाठी औरंगाबादेत भर पावसात मोर्चा काढला होता.

जलील म्हणाले की, नामांतरामुळे आमचे पासपोर्ट/आधार/पॅन/शैक्षणिक कागदपत्रे बदलण्यासाठी पैसे लागतील. त्याचा खर्च सरकार उचलणार का, हेही सरकारने स्पष्ट करावे. तसेच आता तरुणांना नोकऱ्या मिळू लागतील का? आमचे क्रीडा विद्यापीठही परत येईल का? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर केव्हा मिळेल? असे प्रश्नही जलील यांनी उपस्थित करत औरंगाबादला नामांतराची नव्हे तर विकासाची गरज असल्याचंही जलील यांनी म्हटलं.

आधीच्या मोर्चात जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. नामांतरामुळे येणाऱ्या पिढ्या आम्हाला विचारतील की औरंगाबादचे नामांतर होत असताना तुम्ही काय करत होता, असंही जलील यांनी म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com