"तुम्ही आघाडीचा प्रस्ताव द्या, मी हिंदुत्वाच्या नावाने बोंब मारतो"

शिवसेनेचे आमदार आंबादास दानवे यांची जलील आणि फडणवीसांवर तिखट शब्दांत टीका.
Imtiyaz Jaleel And Devendra Fadnavis
Imtiyaz Jaleel And Devendra Fadnavis Team eSakal

एमआयएमचे खासदार आणि प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी राज्यातील महाविकास आघाडीला (MVA) दिलेल्या एका खुल्या प्रस्तावामुळे राजकीय चर्चांना उधान आलं आहे. जलील यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे जलील यांनी हा निरोप दिला. तुम्ही नेहमीच आमच्यावर भाजपची टीम बी असल्याचा आरोप करतात. मात्र आम्ही भाजपला हरवण्यासाठी तुमच्यासोबत येण्यास तयार आहोत. अशी ऑफर जलील यांनी दिली. त्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विशेषत: शिवसेनेची यावरून चांगलीच गोची झाली आहे.

Imtiyaz Jaleel And Devendra Fadnavis
राष्ट्रवादी-शिवसेनेचे भाव वाढले; आघाडीसाठी काँग्रेसवर दबाव

एमआयएमने दिलेल्या ऑफरनंतर सर्वपक्षीयांच्या प्रतिक्रियांमुळे दिवसभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या ऑफरचा थेट विरोध केला नसला तरी शिवसेनेने मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांच्यासह विधानपरिषदेचे आमदार आंबादास दानवेंनी हा फडणवीसांचा प्लॅन असल्याचं म्हटलं आहे. आंबादास दानवे यांनी तर आता एक खास फेसबूक पोस्ट टाकून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

Imtiyaz Jaleel And Devendra Fadnavis
प्रवीण चव्हाण यांच्याकडून माझी बदनामी, मला अडकविण्याचा प्रयत्न - तेजस मोरे

दानवेंनी टाकलेल्या या फेसबूक पोस्टमध्ये फडणवीस आणि जलील यांचा एक फोटो आहे. यामध्ये ते एकमेकांशी बोलत असल्याचं दिसतंय. दानवेंनी केलेल्या पोस्टमध्ये जलील फडणवीसांना म्हणत आहे की, "मी महाविकासआघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो." त्यावर फडणवीस म्हणताहेत की, "मग मी लगेच ठाकरेंच्या नावाने बोंब मारत हिंदुत्वाच्या गप्पा मारतो." त्यामुळे आता या प्रकरणात हा एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com