
Imtiaz Jaleel: बीड जिल्ह्यातील गेवराईमधील अर्धामसला गावातील मशिदीत काल मध्यरात्रीच्या सुमारास दोन तरुणांनी स्फोट घडवून आणल्याची खळबळजनक घटना घडली होती. हे दहशतवादी कृत्य करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी तातडीनं अटक केली. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्यानं परिसरात तणावाची स्थिती होती.
याच घटनेवर आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केलं आहे. या दोघा गुन्हेगारांवर दहशतवादाचं कलम का लावलं नाही? असा सवाल करत पोलिसांच्या फतव्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.