Sambhajinagar Violence: छ. संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू

In Chhatrapati Sambhajinagar there was fight between two groups one them died
Breaking News
Breaking News Sakal

देशभरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. मात्र, छत्रपती संभाजीनगरमधील किऱ्हाडपुरा भागात बुधवारी रात्री एक दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी दिल्याची घटना घडली होती.

दरम्यान या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त ABP माझाने दिलं आहे. ५१ वर्षीय व्यक्तीवर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्याना त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोणत्या करणामुळे झाला हे मात्र अजून पर्यंत समजलं नाही.

किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री 12.30 वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली होती.

Breaking News
"हातपाय तोडून हातात देईल, पंतप्रधानांकडे तक्रार कर" शिवसेनेच्या माजी आमदारची ऑडिओ क्लिप व्हायरल

छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात बुधवारी रात्री हाणामारीची घटना घडली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य बळाचा वापर केला. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Breaking News
High Court: शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा झटका; आमदार निधी वाटपाला स्थगिती

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिनसी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी १५ गाड्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, दंगा भडकवणे आदी कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपास करण्यासाठी ८ पथके तयार करण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com