

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सूत्रधार असलेला वाल्मिक कराड याचे धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध आहेत. या प्रकरणी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला. देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण होत आहेत. खंडणी मागण्यापासून ते हत्या करण्यापर्यंत काय घडलं आणि यात वाल्मिक कराडचा हात कसा होता यावर आतापर्यंत बरीचशी माहिती समोर आलीय. दरम्यान, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी असलेला वाल्मिक कराड मालक कसा बनला याबद्दल सुरेश धस यांनी मोठा खुलासा केलाय.