अनिल देशमुखांचे निवासस्थान, कॉलेजवर इन्कम टॅक्सचा छापा

१०० कोटींच्या वसुलीच्या आरोपामुळे ईडी, सीबीआयचा (Cbi) ससेमिरा मागे लागला आहे.
Anil-Deshmukh
Anil-Deshmukhe sakal

नागपूर: १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपामुळे ईडी, सीबीआयचा (Cbi) ससेमिरा मागे लागलेल्या अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या नागपूर, मुंबई, कॉलेज (college) वर आयकर विभागाने छापे मारले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आयकर विभागाच्या रडारवर आहेत. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT कॉलेज वर आयकर विभागने छापे मारले आहेत.

ईडीने देशमुख यांना बजावलेल्या समन्सविरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर एकल न्या. संदीप शिंदे यांच्या पुढे नुकतीच सुनावणी झाली होती. मात्र ही सुनावणी दोन सदस्य असलेल्या न्यायमूर्तींपुढे सुनावणी व्हायला हवी, असे ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनील सिंह यांनी युक्तिवाद केला होता.

Anil-Deshmukh
पाटील नागालँडचे राज्यपाल, राऊत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष; एकमेकांचे खोचक टोले

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी संबंधीत भ्रष्टाचार प्रकरणाचा गोपनीय अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयच्या एका उपनिरिक्षकाला (CBI sub-inspector) अटक करण्यात आली होती. या अधिकाऱ्याला लाच म्हणून १ लाख रुपयांचा आयफोन-१२ देण्यात आला असल्याचे आता समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआय अधिकारी अभिषेक तिवारीला (Abhishek Tiwari) अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून सुरु असलेल्या तपास अहवालाचा गैरवापर केल्याच्या आरोप करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com