
पुणे - राज्याचे मुख्य रब्बी पीक आता ‘ज्वारी’ ऐवजी ‘हरभरा’ बनले आहे. यंदा शेतकरी हरभरा क्षेत्रात दोन लाख हेक्टरने वाढ करून उत्पादनदेखील किमान २७ लाख टनांच्या पुढे घेतील, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यात हरभऱ्याखालील सरासरी क्षेत्र गेल्या काही वर्षांत ८-१० लाख हेक्टरने वाढलेले आहे. ते यंदा आणखी वाढू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, २०१४ पासून रब्बी हंगामातील पेरणीचा कल (सोईंग ट्रेन्ड) पाहिल्यास शेतकरी साधारणतः १७ लाख हेक्टरच्या आसपास हरभरा पेरत होता. मात्र, गेल्या हंगामात २३ लाख हेक्टरच्या पुढे हरभरा पेरला गेला. यंदा त्यात अजून दोन ते तीन लाख हेक्टरची वाढ अपेक्षित आहे.
रब्बी हंगामात वर्षानुवर्षे ज्वारी आघाडीवर असते. राज्याचे ज्वारीखालील सरासरी क्षेत्र २१ लाख हेक्टरच्या आसपास आहे. इतके सरासरी क्षेत्र इतर पिकाचे नाही. मात्र रब्बी ज्वारीला मागे सारून हरभरा गेल्या हंगामातच पुढे सरकला आहे. यंदा तो आणखी पुढे जाणार आहे. गेल्या हंगामात ज्वारीची लागवड किंचित घटून १९ लाख हेक्टरवर आली होती. यंदा देखील ती वाढण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते.
ज्वारीच्या तुलनेत यंदा हरभऱ्याचे क्षेत्र आणि उत्पादकता देखील वाढण्यास मोठा वाव आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी २३.२१ लाख हेक्टरवर हरभरा पेरताना उत्पादकता प्रतिहेक्टरी १११८ किलो ठेवली होती. त्यातून डाळ मिल तसेच बाजार समित्यांकडे एकूण २५ लाख ९७ हजार टन हरभरा आला. यंदा त्यात अजून दोन-तीन लाख टनांनी वाढ शक्य आहे.
चांगला पाऊस व जलाशयांमधील साठ्यांमुळे हरभरा पेरा शेतकरी वाढवतील, अशी शक्यता बियाणे विक्रेत्यांनी गृहीत धरलेली आहे. २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर हा कालावधी हरभऱ्याच्या पेऱ्यासाठी योग्य मानला जातो. राज्यातील बियाणे विक्रेत्यांनी यंदा खासगी कंपन्या तसेच ‘महाबीज’कडे देखील हरभरा बियाण्यांचे ‘बुकिंग’ वाढवले आहे.
‘बुकिंग’ वाढले
खरिपातील कडधान्य उत्पादनाला यंदा पावसामुळे मोठा फटका बसला आहे. मात्र रब्बीत हरभरा पेरा वाढण्याची शक्यता मोठी आहे. गेल्या हंगामात शेतकरी उत्पादक कंपन्यांना राज्यातील शेतकऱ्यांनी ८९ हजार टन हरभरा विकला होता. त्यातून ४५० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. यंदा ही उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- योगेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक, महाएफपीसी
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.