प्रवाशांची गर्दी पाहता तुतारी एक्स्प्रेसच्या डब्ब्यांमध्ये वाढ

प्रवाशांची गर्दी पाहता तुतारी एक्स्प्रेसच्या डब्ब्यांमध्ये वाढ

मुंबई : दिवाळीला काही दिवस शिल्लक असतानाच चाकरमण्यांनी गाव गाठायला सुरुवात केली आहे. यामुळेच कोकणात जाणा-या ब-याच रेल्वेगाड्या फुल झाल्या असल्याने रेल्वे प्रशासनाकडून तुतारी एक्स्प्रेसच्या स्लिपर तसेच जनरल डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

त्यामुळे आता तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या २२ झाली आहे. 23 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान स्लीपरचा एक डबा तर 3 जनरल डब्यांमध्ये वाढ करण्यात आले आहेत. तसेच, अप, डाऊन अशा दोन्ही मार्गावर डब्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. यासोबतच एक विशेष गाडी देखील सोडण्यात येणार असून ही गाडी 25 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर शुक्रवारी रात्री 1.10 वाजता करमळीसाठी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीसाठी कोकणात जाणाऱ्यांना चाकरमण्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील कोकणकन्या, जनशताब्दी, तेजस, राजधानी या रेल्वेगाड्या फुल झाल्या असल्याने यात प्रवाशांची प्रतीक्षा यादी वाढली आहे. यात विनावातानुकुलित गाड्यांची प्रतिक्षा यादीतर थेट 400 वर पोचली आहे, तर विशेष गाड्यांत सध्यस्थितीला 30 पर्यंत प्रतिक्षा यादी आहे. दरम्यान वाढत्या प्रतिक्षा यादीमुळे कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी तुतारी एक्सप्रेसच्या डब्ब्यांत वाढ कऱण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com