सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

मुंबई - ऐन दुष्काळात वाढत्या महागाईचे चटके सामान्य जनतेला बसत असताना सरकारी कर्मचाऱ्यांची मात्र दिवाळी झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात तीन टक्‍के वाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एक ऑक्‍टोबर 2018 पासून ही महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत दिलासा मिळाला आहे. एक जानेवारी ते 30 सप्टेंबरदरम्यानच्या नऊ महिन्यांच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येतील असेही सरकारने स्पष्ट केले आहे. 

सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्ता 139 टक्‍के इतका होता. त्यामधे तीन टक्‍क्‍यांची वाढ करत तो 142 टक्‍के करण्यात आला आहे.

Web Title: Increase in Dearness Allowance of Government employees