
Maharashtra Zika Virus Patients Increased: राज्यभरात आजतागायत १४० झिका रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. सर्वाधिक रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रात सापडले आहेत. जुलैमध्ये झिका रुग्णांची संख्या ३९ होती. साडेचार महिन्यांत ही संख्या १००ने वाढली असल्याचे दिसते.
तसेच, मुंबईत दादरच्या उत्तर भागात एका रुग्णाची नोंद झाल्याने मुंबई महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. सर्वाधिक धोका असलेल्या गर्भवतींचे सर्वेक्षण करून तपासणीवर भर देण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.