मुद्रा योजनेची व्याप्ती वाढवली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ जास्तीत जास्त घटकांना मिळावा, यासाठी सरकारने मुद्रा योजनेची व्याप्ती वाढवली आहे. यामुळे मुंबईचे डबेवाले, लघुउद्योजक, ई-कॉमर्स कंपन्यांचे पुरठादार, केबल ऑपरेटर्स यांना मुद्रा कर्ज उपलब्ध होणार आहे.

मुंबई - पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ जास्तीत जास्त घटकांना मिळावा, यासाठी सरकारने मुद्रा योजनेची व्याप्ती वाढवली आहे. यामुळे मुंबईचे डबेवाले, लघुउद्योजक, ई-कॉमर्स कंपन्यांचे पुरठादार, केबल ऑपरेटर्स यांना मुद्रा कर्ज उपलब्ध होणार आहे.

बॅंकांबरोबरच खासगी वित्त संस्थादेखील मुद्रा कर्ज वितरित करणार आहेत. मुंबईत बुधवारी "पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून रोजगार आणि उद्योजकता निर्मिती' या विषयावरील बैठकीत अर्थ सेवा सचिव राजीव कुमार यांनी माहिती दिली. उद्योग, बॅंका आणि सरकार यांच्यातील भागिदारीवर या वेळी शिक्कामोर्तब करण्यात आले.

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणि खासगी बॅंकांबरोबरच हिंदुजा लेलॅंड फायनान्स, हिरो फिनकॉर्प, श्रीराम फायनान्स, मुथ्थुट फायनान्स, टाटा मोटर्स फायनान्स, बजाज फायनान्स अशा कंपन्याही मुद्रा योजनेच्या व्यासपीठावर आल्या आहेत. ओयो, ओला, उबेर, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मेरू, कारझोनरेंट, यात्रा, मेक माय ट्रीप, स्वीग्गी, झोमॅटो, ग्रॅब, डिल्हीवरी यांचे पुरवठादार, इंडियन ऑइल, बीपीसीएलसारख्या तेल कंपन्यांचे रिटेलर्स, बिग बास्केट आणि मुंबईच्या डबेवाल्यांबरोबरच केबल ऑपरेटर्सनाही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज दिले जाणार आहे. विविध सेवा क्षेत्रातील या कंपन्यांना, उपक्रमांना आपापल्या सेवांच्या विस्तारासाठी नव्या सदस्यांची आवश्‍यकता भासत असते. यासाठी मुद्रा योजना सहायक ठरू शकते, असे कुमार यांनी सांगितले. मुद्रा योजनेने तीन वर्षात एकूण 5.73 लाख कोटींचे कर्ज वितरित केले आहे.

Web Title: Increase the scope of the currency scheme