स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला कत्तलखाना तसेच चिकन मटन विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्यातील काही महानगर पालिकांनी घेतला आहे. यामध्ये केडीएमसी, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या महापालिकांचा समावेश आहे. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटलं आहे.