सत्यजीत तांबेंची खेळी; भरला अपक्ष उमेदवारी अर्ज :Graduate Constituency Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satyajit tambe

Graduate Constituency Election: सत्यजीत तांबेंची खेळी; भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Satyajit Tambe महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी नाशिक शिक्षण मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे.

तांत्रिक काही अडचणीमुळे मी दोन अर्ज भरले आहेत. मला अपक्ष म्हणून निवडणुक लढवावी लागेल. अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

काय म्हणाले तांबे?

अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असलो तरी मी कॉंग्रेसचाच उमेदवार आहे. कॉंग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात ठरवलं होतं. मात्र, सुधीर तांबे यांनी मुलासाठी माघार घेतली. पण सत्यजित यांना उमेदवारी मिळण्यास कमी कालावधी उरला. त्यामुळे त्यांंना अपक्ष म्हणून निवडणुक लढवावी लागणार. आज अर्ज भरण्याची अखेरची तारीख होती. तांत्रिक काही अडचणीमुळे मी दोन अर्ज भरले आहेत. मात्र मला आता अपक्ष म्हणून निवडणुक लढवावी लागणार.

शिक्षकांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. माझ्या वडिलांनी १४ वर्षा सातत्याने प्रयत्न केला. त्यांच कार्य पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन. भाजपने उमेदवारीसाठी काही चर्चा केली होती का? असा सवाल उपस्थित केला असता. माझी त्यांच्याशी कोणती चर्चा झालेली नाही. आणि ही माहिती खरी आहे की खोटी हे मला माहिती नाही.

हेही वाचा: Auto Expo 2023: आता पैशांसोबत ATM मध्ये मिळणार डिझेल; जाणून घ्या डिटेल्स

पण मी आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांना पाठिंबा देण्याची मागणी करणार आहे. नविन नेतृत्वाला, युवकांना संधी देण्याचं काम फडणवीस करत असतात. त्यांच माझ्यावर प्रेम आहे. हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे मला वाटतं की ते मला पाठिंबा देतील.

पदवीधर निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे हे दोघेही कार्यालयात दाखल झाले होते. मात्र, आपल्या मुलासाठी सुधीर तांबे यांनी माघार घेतली. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली होती.

टॅग्स :Nashik