
Auto Expo 2023: आता पैशांसोबत ATM मध्ये मिळणार डिझेल; जाणून घ्या डिटेल्स
Diesel ATM : आपल्यापैकी प्रत्येकजण पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करतो. पण जर, तुम्हाला सांगितले की, आता एटीएममधून डिझेल आणि इथेनॉलदेखील मिळेल असे सांगितले तर, विश्वास बसणार नाही ना?
हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Auto Expo 2023
वाचून आश्चर्याचा धक्का बसला ना? पण तुम्ही जे वाचलं ते अगदी तंतोतंत खरं आहे. सध्या दिल्लीतील ग्रेटर नोयडामध्ये ऑटो एक्सो सुरू आहे. यादरम्यान डिझेल एटीएम व्हॅन सादर करण्यात आली आहे. सध्या या व्हॅनची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
या व्हॅनच्या माध्यमातून ग्राहक ऑर्डर देऊन गाडीमध्ये डिझेल भरू शकणार आहेत. या सेवाचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना मोबाईल अॅप्लिकेशनवरून ऑर्डर द्यावी लागेल. त्यानंतर ही डिझेल व्हॅन तुमच्या घरी येऊन तुमच्या गाडीत डिझेल भरू देईल.
हेही वाचा: Mahua Moitra : महुआ मोईत्रा PM मोदींच्या वाटेवर; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या, काय माहिती...
ऑनलाइन इंधनाची मागणी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे वाहन तुमच्या घरी येऊन डिझेल रिफिल करून देईल. सध्या डिझेल आणि इथेनॉलसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या डिझेल एटीएममुळे ग्राहकांची भेसळयुक्त डिझेल आणि इंधन चोरीपासून सुटका होण्यास मदत होणार आहे. याद्वारे ग्राहकांना शुद्ध इंधनाचा पुरवठा केला जाणार आहे.
हेही वाचा: Koyta Gang : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; गँगमधील मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या
सादर करण्यात आलेलं डिझेल एटीएम सध्या काश्मीर आणि कन्याकुमारी दरम्यान सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी 280 युनिट डिझेल एटीएम कार्यरत असून, यामध्ये 1,000 ते 2,000 लिटर साठवणुकीची सोय आहे आणि 6,000 लिटर क्षमतेचे ट्रकही उपलब्ध आहेत.
या एटीएमची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला पंपावरील दरामध्येच इंधन विकत घेता येणार आहे. इंधनपंपाची सुविधा नसलेल्या अनेक भागात हे एटीएम सहज पोहोचू शकते त्यामुळे वाहनचालकांचा त्रास कमी होणार आहे.