महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सारखीच देशात इंडिया आघाडी यशस्वी होईल.. डॉ.अमोल कोल्हेंचं वक्तव्य चर्चेत

Amol Kolhe
Amol Kolhe Esakal

महाराष्ट्रत महाविकास आघाडीचा प्रयोग शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून यशस्वी केला गेला.त्या नंतर आता देश पातळीवर इंडिया गटबधंन तयार झाले याची सत्तेत असलेल्यांना दहशत असून भिती वाटत आहे. पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल येइल त्या निकाला नंतर जनतेला कळेल की सत्ताधाऱ्याची सत्ता जात असून इंडिया आघाडी यशस्वी होत आहे असे प्रतिपादन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.

ओतूर ता.जुन्नर येथील शुभश्री लॉन्स मध्ये ता.१३ बुधवारी रोजी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गटाचा जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्याच्या मेळावात कोल्हे मार्गदर्शन करत होते.

Amol Kolhe
MP Amol Kolhe : दादांचा एकनिष्ठ शिलेदार साहेबांच्या गटात

यावेळी राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे,कार्याध्यक्ष देवदत्त निकम,जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले, तालुकाध्यक्ष तुषार थोरात,जिल्हा युवा अध्यक्ष स्वप्निल गायकवाड,पुणे येथील नगर सेवक विशाल तांबे,अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इर्शादभाई पटेल,माजी पंचायत समिती सभापती विशाल तांबे,माजी जि.प.सदस्य मोहित ढमाले,शरद लेंडे,सुरज वाजगे,प्रमोद भुंताडे,रमेश मेहत्रे, अनिल तात्या मेहेर,दादाभाऊ बगाड,रोहिदास वेठेकर,तुळशीराम भोईर,पांडुरंग शिंदे,प्रभाकर शिंदे,सुरेखा वेठेकर,वैभव तांबे,विलास दांगट,छाया तांबे,प्रशांत डुंबरे,सचिन आंबडेकर,गोविंद साबळे,रोहिणी माळी,संजय नायकोडी,तान्हाजी डुंबरे,गोरक्षनाथ फापाळे,संचित फापाळे,गोविंद तांबे,अरूण मोरे,बाळासाहेब होनराव,संभाजी लोहोटे,ओतूर तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन तांबे,अमोल म्हसणे,जनार्दन खामकर,शांताराम वारे,स्मिता डुंबरे,अशोक शिंदे,बाळासाहेब होनराव व इतर उपस्थित होते.

Amol Kolhe
Amol Kolhe Video : भाजपचं केंद्रीय नेतृत्व संकटात! अजित पवारांच्या बंडाची Inside Story; अमोल कोल्हेंचे खळबळजनक दावे

यावेळी तुषार थोरात,सावळेराम पाडेकर,अनिल तात्या मेहेर,रमेश मेथरे,दादाभाऊ बगाड,विजय कुर्‍हाडे,हाजी इशरत भाई आतार,मोहित ढमाले,अनंतराव चौगुले,सुरेखा वेठेकर,स्वप्निल गायकवाड, देवदत्त निकम व जगन्नाथ शेवाळे यांनी ही मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन विशाल डुंबरे

खासदार डॉ.अमोल कोल्हे पुढे म्हणाले अतुल बेनके हे कुंपणावर असून त्यानी तातडीने निर्णय घ्यावा ह्या कार्यकर्त्याच्या भावना आहे.अतुल बेनके असतील किवा मी असेल जुन्नर तालुक्याचे उदाहरण महाराष्ट्र प्रस्थापित व्हावे,आम्ही पवार साहेबांच्या विचाराने जावे यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करून.

Amol Kolhe
Amol kolhe: 'शरद पवारांना सोडू नका' अमोल कोल्हेंच्या कानात चिमुकल्याची भावनिक साद, नेमकं काय घडलं?

विचारधारा स्विकारताना ज्यानी वर्षानु वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी,बहुजन समाजासाठी,विद्यार्थ्यासाठी,सर्वसामान्य माता भगीनीसाठी आग्राहाची भूमिका मांडत राहीली ती पवार साहेबांची भूमिका स्वीकारायची की आता नविन प्रवृत्ती आली ती स्वीकारावी ज्यांनी मे देश बिकने नही दुंगा म्हणत सत्तेत आले आणि सर्वच विकत राहीले त्यांच्या हातात आपण देशा देणार का याचा विचार केला गेला पाहिजे.

विकासासाठी गेले म्हणणारे माना झुकवून बसत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात या शिवजन्म भूमीकडे मोठ्या अपेक्षेने पाहतोय त्यामुळे या शिवजन्म भूमीच्या प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की आपली जी वाटचाल आहे ती माना झुकवणारी नसून छातीवर वादळ झेलणारी असावी.आपला स्वाभिमान महत्वाचा असून तो जागरूक असायला हवा. गट-तट विसरूण संघटना बळकट करण्याचे काम सर्वांनी करावे.

Amol Kolhe
Amol Kolhe : इंडिया आघाडीला साथ द्या - खासदार अमोल कोल्हे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com