Prescription Now Mandatory for Cough Syrup
esakal
Cough Syrup Death Case : विषारी कफ सिरपमुळे देशभरात १५ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. यात नागपूरच्या रुग्णालयात झालेल्या १८ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. त्यामुळे प्रशासन खळबळून जागं झालं आहे. यासंदर्भात अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सिरप प्रवर्गातील औषधी देऊ नये, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामु्ळे अशा औषधांसाठी आता डॉक्टरांचा प्रिस्क्रिप्शन लागणार आहे.