
मुंबई : सणासुदीचा काळ सुरु झाला असून यावेळी सुट्टीच्या कालावधीत अनेकजण आपले कुटुंब तसेच मित्र-परिवारासह गावी जातात. अशावेळी रेल्वे प्रशासनाकडूनही प्रवाशांची मोठी गर्दी पाहता जादा गाड्या सोड्यात येतात. मात्र अशातच रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.