esakal | भारतातील लोकप्रिय पर्यटनस्थळे; कोविडचा धोका टाळण्यासाठी ऐनवेळी बुकिंग
sakal

बोलून बातमी शोधा

darjiling

भारतातील लोकप्रिय पर्यटनस्थळे; कोविडचा धोका टाळण्यासाठी ऐनवेळी बुकिंग

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : गोवा, म्हैसूर, मनाली व दार्जिलिंग ही पर्यटनस्थळे भारतीय पर्यटकांना (Indian Tourist centers) सर्वात जास्त आवडतात. कोविडचा (corona) धोका नको म्हणून ऐनवेळी बुकिंग केले जाते, असे एका पर्यटन पोर्टलच्या सर्वेक्षणात (tourist survey) आढळून आले आहे. देशात अनलॉकिंग मोठ्या प्रमाणावर होत असून आता पर्यटनक्षेत्रही खुले होण्यास सुरुवात झाली आहे. अशावेळी ओयो या पर्यटनविषयक पोर्टलने दिलेल्या अहवालात (tourism report) ही बाब नमूद केली आहे.

हेही वाचा: खालापूरात पत्नीच्या खून प्रकरणी पतीला अटक

जागतिक लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या यादीत गोव्याचाही समावेश झाला आहे. तर देशातील दहा लोकप्रिय पर्यटनस्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील लोणावळ्याचा समावेश आहे. गोवा, जयपूर आणि मनाली ही येत्या सुट्टीच्या हंगामातील भारतातील सर्वोत्तम आरामदायी पर्यटनस्थळे ठरली आहेत. पर्यटकांच्या पसंतीक्रमानुसार थंड हवेच्या ठिकाणांखालोखाल पुरातन शहरे आणि समुद्र किनार्‍यांवरील पर्यटनस्थळांना पसंती मिळत आहे.

त्याखालोखाल ऊटी आणि म्हैसूर तसेच दार्जिलिंग ही शहरेही लोकप्रिय होत आहेत. 37 टक्‍के प्रवाशांनी डोंगरदर्‍यांना प्राधान्य दिले, 33 टक्‍के पर्यटकांनी समुद्रकिनार्‍यांना पसंती दिली. उरलेल्या 14 टक्‍के फिरस्त्यांनी मोटारीने प्रवास करण्याच्या ठिकाणांबाबत आवड दाखवली. त्याखालोखाल पुरातन वास्तूंच्या शहरांना आणि तीर्थक्षेत्रांना प्राधान्य दिले जात आहे.

आता कोविडसंदर्भात परिस्थिती बदलली तर धोका नको म्हणून 57 टक्‍के पर्यटक हे प्रवासाच्या दिवसाच्या फक्त काही दिवस आधीच बुकिंग करण्याला प्राधान्य देत असल्याचे देखील दिसून आले. पूर्वी प्रवासाचे नियोजन करण्यासाठी वेळ घेतला जात असे आणि कित्येक आठवड्यांपूर्वी किंवा अगदी महिन्यांपूर्वी देखील आगाऊ बुकिंग केली जात असत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे

loading image
go to top