खालापूरात पत्नीच्या खून प्रकरणी पतीला अटक

पत्नीची हत्या करणाऱ्याला अटक
culprit arrested
culprit arrestedsakal media

खालापूर : क्षुल्लक वादातून पत्नीची हत्या (wife murder) करून पसार झालेल्या लक्ष्मण वाघमारे (Laxman waghmare) या आरोपीला खालापूर पोलिसांनी (khalapur police) अवघ्या १२ तासांत अटक (culprit arrested) केली आहे. मृत महिलेचे नाव शकुंतला (५०) असे आहे.

culprit arrested
शासकीय निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण; २१ महिने पेन्शन न मिळाल्याने हैराण

शकुंतला आणि लक्ष्मण हे आंजरूण येथे मजुरीच्या निमित्ताने राहत होते. त्यांच्यामध्ये शनिवारी रात्री मद्यपानानंतर भांडण झाले होते. या रागाच्या भरात लक्ष्मणने शकुंतलाच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर लक्ष्मण फरारी झाला होता, तर शकुंतलाचा मृतदेह आंजरूण येथे हॉलिडे रिसॉर्टसमोर रस्त्यावर पडला होता. याबाबत माहिती पोलिस पाटील जयवंत रसाळ यांनी खालापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तसेच तपास चक्रे वेगाने फिरवत लक्ष्मण याला जेरबंद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com