आंतरराष्ट्रीय नेमबाजीत भारताला सुवर्ण पदक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

कोल्हापूर : सुल (जर्मनी) येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील  हिने ५० मीटर फ्री पिस्टल प्रकारात सांघिक सुवर्ण पदक पटकावले.

अनुष्का, उत्तर प्रदेशची देवांशी धामा व उत्तराखंडच्या नेहा यांचा भारतीय संघात समावेश होता. त्यांनी जिगरबाज खेळी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. ५० मीटर फ्री पिस्टल प्रकार हा  मुलींसाठी प्रथमच सुरू केला आहे. अतिशय कमी कालावधीत सराव करून मुलींच्या या संघाने भारतासाठी दिमाखदार कामगिरी केली. 

अनुष्का विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलमधून ९० टक्के मार्क मिळवून दहावी उत्तीर्ण झाली आहे. तिने दिल्ली येथील कुमार सुरेन्द्र सिंह नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राला सांघिक रौप्य पदक मिळवून दिले आहे.

महाराष्ट्राच्या या संघामध्ये राही सरनोबत, अनुष्का पाटील व श्रेया गावंडे यांचा समावेश होता. तिची जागतिक स्पर्धेला निवड झाल्यामुळे तिला कुमार सुरेंद्र सिंग स्पर्धेची फायनल खेळता आली नाही. तिला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रोत्साहन, क्रीडा प्रबोधिनीचे मार्गदर्शक अजित पाटील, कय्यूम, युवराज साळोखे, जितेंद्र विभूते, विनय पाटील, युवराज चौगले यांचे मार्गदर्शन मिळाले.

स्पर्धेत भारतीय संघाने १५६५ गुण मिळवून ५० मीटर फ्री गटात सुवर्ण पदक मिळवले, तर १५३९ गुण मिळवून रशियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. युक्रेनने १५२७ गुण मिळवून कास्यपदक मिळवले.  

Web Title: India's gold medal in international shooting