जेव्हा मंत्री भागवत कराड विमानात रुग्णावर करतात उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेव्हा मंत्री भागवत कराड विमानात रुग्णावर करतात उपचार

जेव्हा मंत्री भागवत कराड विमानात रुग्णावर करतात उपचार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड (Minister Bhagwat Karad) हे दिल्लीवरून मुंबईला प्रवास करत होते. त्याच विमानात एका व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर व्यवसायाने डॉक्टर असलेले मंत्री कराड त्या व्यक्तीजवळ पोहोचले आणि त्याच्यावर यशस्वी उपचार केले. त्यामुळे इंडिगो एअरलाईन्सकडून (Indigo Airlines) त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

हेही वाचा: ''आजारी मुख्यमंत्री-आजारी सरकार'', नारायण राणेंची टीका

भागवत कराड 6E 171 या इंडिगोच्या विमानाने दिल्लीवरून मुंबईला परतत होते. विमानाने उड्डाण भरल्यानंतर जवळपास एक तासाने एका ४० वर्षीय प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर कॅबिन क्रूने विमानात कोणी डॉक्टर आहे का? अशी विचारणा केली असता व्यवसायाने डॉक्टर असलेले मंत्री कराड यांनी पुढाकार घेतला. त्यांनी त्या प्रवाशावर काही प्रथमोपचार केले. तसेच विमानाच्या आपत्कालीन किटमध्ये उपलब्ध असलेले एक इंजेक्शन देखील दिले. त्यानंतर रुग्णाला बरे वाटू लागले. विमान मंगळवारी पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी मुंबईत लँड झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

इंडिगो एअरलाईन्सकडून कौतुक -

एका प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागताच मंत्री कराड स्वतः धावून आले आणि त्यांनी त्या रुग्णावर उपचार केले, असं ट्विट करत अमित चव्हाण या एका प्रवाशाने मंत्री कराड यांचे कौतुक केले आहे. इंडिगो एअरलाईन्सने देखील ट्विट करत मंत्री कराड यांचे कौतुक केले आहे. ''डॉ. कराड यांनी सहप्रवाशावर उपचार करत त्याची मदत केली आहे. तुमचा प्रामाणिकपणा आणि कर्तव्य पार पाडल्याबद्दल तुमचे कौतुक करावे तितके कमी'', असं ट्विट इंडिगो एअरलाईन्सने केले आहे.

loading image
go to top