Maharashtra Budget: इंदूमिल स्मारकाचा निधी वाढला! बाळासाहेबांच्या स्मारकासाठीही फडणवीसांची मोठी घोषणा

राज्याच्या अर्थसंकल्पात फडणवीसांच्या मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर
Maharashtra Budget
Maharashtra BudgetEsakal

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकार आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडत आहे. त्यांनी आपला अर्थसंकल्प पंचामृतावर आधारित असल्याचं म्हटलं. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प मांडला आहे.

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास

- श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये

- भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये

- श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये

- श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : 25 कोटी रुपये

- श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी

- प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी

- गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये

- श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: 6 कोटी रुपये

- श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : 25 कोटी रुपये

Maharashtra Budget
Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता वर्षाला ६ नव्हे तर १२ हजार रुपये मिळणार !

स्मारकासाठी देण्यात आलेला निधी

- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार

- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी

- भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये

- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये

- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये

- स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये

- विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी

- स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये

Maharashtra Budget
फडणविसांचं मिशन लक्षवेध! स्पोर्ट्समध्ये महाराष्ट्राची कामगिरी उंचावण्यासाठी मोठ्या घोषणा!

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्मरण स्वातंत्र्यसमराचे

- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक

- विदर्भात झालेल्या जंगल सत्याग्रहाची तीन ठिकाणी स्मारके

- मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com